जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारा मधुमेह तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:39+5:302021-04-12T04:25:39+5:30
बल्लारपूर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारे स्थानिक डॉ. नंदा वैध यांच्या क्लिनिकमध्ये निशुल्क ...

जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारा मधुमेह तपासणी
बल्लारपूर : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील जेसीआय राजुरा रॉयल्सद्वारे स्थानिक डॉ. नंदा वैध यांच्या क्लिनिकमध्ये निशुल्क मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी डॉ. नंदा वैद्य यांनी मधुमेहावर अनेक उपचार सांगितले. तसेच ते टाळण्यासाठी उपायदेखील सांगण्यात आले. या निशुल्क सेवेचा अनेक बल्लारपूरवासीयांनी लाभ घेतला. कोविड-१९च्या नियमाचे पालन करीत १२२ रुग्णांनी तपासणी केली. जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्ष स्मृती व्यवहारे यांनी आपल्या भाषणात कोविड-१९च्या या परिस्थितीत मधुमेह व रक्तप्रवाह या सगळ्या गोष्टी सुरळीत राहणे अतिशय आवश्यक आहे. याबरोबर आपण फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, मास्क व सॅनिटायझर वापरणे फार गरजेचे आहे, असे सांगितले. याप्रसंगी मनीषा पून व रोहिणी गुडेकर, सुषमा शुक्ला, जयश्री शेंडे, सुशीला पोरेड्डीवार, रेखा बोढे, मधुस्मिता पाढी, मनीषा पून, प्रफुल्ला धोपटे, ज्योती मेडपल्लीवार, मंजू गौतम, राधा विरमलवार , स्वरूपा जांवर, आशा चंदेल, कविता कुमार, श्यामा बेलसरे, प्रतिमा ठाकूर, रोहिणी गुडेकर उपस्थित होते.