धर्म सभा म्हणजे संस्काराची कार्यशाळा
By Admin | Updated: November 21, 2015 00:44 IST2015-11-21T00:44:57+5:302015-11-21T00:44:57+5:30
सध्यास्थितीत आपण डिजीटल इंडियाच्या गोष्टी करीत आहोत. मात्र व्यवहार कुशलता व संस्काराचे प्रशिक्षण शुल्क आकारून घेतले जात आहे.

धर्म सभा म्हणजे संस्काराची कार्यशाळा
विचक्षण व्याख्यानमाला : चंद्रकुमार जैन यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : सध्यास्थितीत आपण डिजीटल इंडियाच्या गोष्टी करीत आहोत. मात्र व्यवहार कुशलता व संस्काराचे प्रशिक्षण शुल्क आकारून घेतले जात आहे. ज्या गोष्टी आपण शुल्क मोजून शिकतो त्यापेक्षा आधिक पटीने चांगल्या गोष्टी धर्म सभांच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे धर्म सभा म्हणजे संस्काराची कार्यशाळा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती पदकाने सन्मानित जैन समाजरत्न प्रा. डॉ. चंद्रकुमार जैन यांनी केले.
शांतिनाथ जैन मंदिर चंद्रपूर द्वारा जैन मंदिर शताधिक महोत्सवानिमीत्त्य आयोजित विचक्षण व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. चंद्रकुमार जैन पुढे म्हणाले, धर्म सभांच्या माध्यमातून मोफत व सहज ज्ञान प्राप्त होते. मात्र अनेकांना येथे येण्यासाठी वेळ नाही. मुलांना संस्कारीत करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करून आपल्या मुलांना संस्कारीत करण्यासाठी त्यांना वेळ देण्याची गरज आहे, तसा संकल्प करूया, असे ते म्हणाले.
साध्वीजी श्री हेमप्रज्ञाजी महाराज यांनी व्याख्यानमालेच्या प्रारंभी विचक्षणजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हणाल्या, त्यांच्या जीवनात सहजता, सुलभता, मधुरता, सहनशीलता आदी गुण होते. कुणाची चुक झाल्यास त्यांना सगळ्यांसमोर न सांगता एकटे बोलावून चुक लक्षात आणून देत होत्या, असे सांगितले.
गुरूवारी सायंकाळी जैन भक्ती संगीतकार मेहुल कुमार रुपडा, जालना व त्यांच्या चमूने भगवान शांतीनाथ व श्री विचक्षणजी महाराज तथा जैन दर्शनावर संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. महोत्सव दरम्यान पाच दिवसीय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)