शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धानोरकर गटाला जबर धक्का, चंद्रपूर मनपात स्थायीमध्ये विजय वडेट्टीवार गटाची सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:25 IST

Chandrapur : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांच्या नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी गुरुवारी (दि. ५ मार्च) आयोजित विशेष सभेत महापौरांनी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांच्या नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी गुरुवारी (दि. ५ मार्च) आयोजित विशेष सभेत महापौरांनी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली. मात्र काँग्रेसकडून स्थायी समितीत पाठविण्यात आलेली सर्व सातही नावे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाशी संबंधित असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय चर्चा शहरात रंगली आहे.

स्थायी समितीत काँग्रेसचे ७, भाजपचे ६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे २ आणि जनविकास सेनेचा १ सदस्य अशा एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वसंत देशमुख, सचिन कत्याल, राजेश अड्डूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर आणि विनोद लभाने यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून सुभाष कासनगोटूवार, संजय कचर्लावार, प्रज्वलांत कडू, सारिका सुंदरकर, सविता सरकार आणि पुष्पा उराडे यांची निवड झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी गिन्हे आणि श्रुती घटे यांची नावे निश्चित करण्यात आली असून जनविकास सेनेकडून पप्पू देशमुख स्थायी समितीत जाणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून स्थायी समितीत पाठविण्यात आलेल्या सातही सदस्यांचा संबंध आमदार विजय वडेट्टीवार गटाशी असल्याचा आरोप करत धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी महानगरपालिका परिसरात काँग्रेस गटनेतृत्वाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी समोर आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhanorkar Group setback: Vijay Wadettiwar faction wins Chandrapur corporation standing committee.

Web Summary : Vijay Wadettiwar's group secured dominance in Chandrapur Municipal Corporation's standing committee, sidelining the Dhanorkar faction. Congress groupism surfaced as Dhanorkar's supporters protested.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस