दीक्षाभूमीवर आजपासून धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:42 IST2018-10-14T22:41:49+5:302018-10-14T22:42:08+5:30
येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांची जय्यत तयारी करणे सुरू होते. ही तयारी सायंकाळी अंतिम टप्प्यात आली आहे.

दीक्षाभूमीवर आजपासून धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ आॅक्टोबर रोजी ६२ वा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील भंते व आंबेडकर अनुयायांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रविवारी विविध स्टॉल व रंगमंचांची जय्यत तयारी करणे सुरू होते. ही तयारी सायंकाळी अंतिम टप्प्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने आयोजित धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला १५ आॅक्टोबरला सायंकाळी ४ वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शांती मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. यावेळी भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई, महाथेरो भदंत ज्ञानज्योती महास्थवीर उपस्थित राहतील. १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशासह लक्षवेधक मिरवणूक दीक्षाभूमीपर्यंत काढण्यात येणार आहे. मुख्य समारंभ सायंकाळी ५ वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजीजू, ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले, आ. नाना श्यामकुळे, उपस्थित राहतील.