विकासकामांनी चंद्रपूरचा चेहरा बदलला
By Admin | Updated: February 28, 2017 00:34 IST2017-02-28T00:34:59+5:302017-02-28T00:34:59+5:30
विकासाची दृष्टी, प्रबळ ध्येय आणि कर्तृत्वाची जोड या त्रिसूत्रीचा अवलंब करुन चंद्रपूरमहानगराचा चेहरामोहरा बदलून ...

विकासकामांनी चंद्रपूरचा चेहरा बदलला
हंसराज अहीर : विविध विकास कामांचे भूमिपूजन
चंद्रपूर: विकासाची दृष्टी, प्रबळ ध्येय आणि कर्तृत्वाची जोड या त्रिसूत्रीचा अवलंब करुन चंद्रपूरमहानगराचा चेहरामोहरा बदलून विकासाभिमुख व सोयी- सुविधांची सुसज्ज अशा महानगराची उभारणी करण्याच्या दिशेने भाजपाने पाऊल उचलले आहे. फक्त अडीच वर्षांच्या काळात चंद्रपुरात रस्ते, वीज, पाणी या मुभलूत गरजांबरोबरच ओपनस्पेसचे, चौकांचे, उद्यानांचे ऐतिहासीक तलावाचे सौंदर्यीकरण केले.महानगरवासीयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महापौर, नगरसेवक सदैव तत्पर राहून आपले कर्तव्य बजावतील, असे अभिवचन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
ओमनगर व छत्रपती नगर येथे खासदार व आमदार स्थानिक विकास निधीतंर्गत प्रस्तावित रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, भाजपा गटनेते अनिल फुलझेले, भाजपा नेते सुभाष कासनगोट्टूवार, मोहन चौधरी, नगरसेवक रवींद्र गुरनुले, नगरसेविका रत्नमाला वायकर, माया उईके, प्रमोद शास्त्रकार, संजय खनके, श्रीकांत भोयर, सोपान वायकर, सुनील डोंगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी ना. अहीर म्हणाले की, चंदपूरला महानगराचे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात या शहरात होणारा विकास हा संपूर्ण राज्यात अग्रेसर आहे. ‘सबका साथ, सबका विकास’, हा दृष्टिकोन ठेवत या विकासाची वाटचाल सुरु आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अमिन भाई, विठ्ठल डुकरे, हरिश्चंद्र भाकरे, सुधाकर बोंडे, पवन भुते, मधुकर सपाटे, छदामीलाल विश्वकर्मा, मुकुंद उगे, पुष्पा शेंडे, नीलेश मोहोड, कल्पना बहीरम, ऋषी दोनाडकर यांच्यासह वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( नगर प्रतिनिधी)