राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:34+5:302021-03-23T04:29:34+5:30

यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चंद्रपूरचा २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत मौजा आर्वी येथील अंगणवाडी क्र. १ ते साळवे ...

Development work worth Rs. 50 lakhs started in Rajura taluka | राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चंद्रपूरचा २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत मौजा आर्वी येथील अंगणवाडी क्र. १ ते साळवे यांच्या घरापर्यंतचा अंदाजित किंमत १० लाख रुपये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, मौजा खामोना येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे - किंमत १० लाख, मौजा पांढरपौनी येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे - किंमत १५ लाख, मौजा नाईकनगर येथील मेनरोड ते नाईक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे बांधकाम करणे - किंमत १५ लाख रुपये या कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरनुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जि. प. सदस्य डॉ. नामदेव करमनकर, पं. स. सदस्य रामदास पुसाम, आर्वी येथे शालू लांडे, सुभाष काटवले, उषा उपरे, सुरेख रामटेके, सुवर्णा महाकुलकर, वंदना मुसळे, ताने कोहपरे, बंडू आईलवार, मारोती महाकुलकर, भास्कर डोंगे, खामोना येथील हरिदास झाडे, कवडू सातपुते आदी उपस्थित होते.

Web Title: Development work worth Rs. 50 lakhs started in Rajura taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.