विकासकामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही
By Admin | Updated: August 6, 2014 23:45 IST2014-08-06T23:45:36+5:302014-08-06T23:45:36+5:30
तालुक्याचा विकास करायचा असेल तर, तालुक्यांंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून विकासकामांना गती द्यावी या कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,

विकासकामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही
आढावा बैठक : आमदारांनी दिली अधिकाऱ्यांना तंबी
गोंडपिपरी : तालुक्याचा विकास करायचा असेल तर, तालुक्यांंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून विकासकामांना गती द्यावी या कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी येथे पार पडलेल्या तालुका समन्वय समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.
बैठकीला सभापती हर्षा चांदेकर, पंचायत समिती सदस्य रामचंद्र कुरवटकर, रत्नमाला तोरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजु चंदेल, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष सुरेश चौधरी, समन्वय समिती सचिव तथा तहसिलदार मल्लीक विरानी, संवर्ग विकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नियत व एफ.डी.सी.एम., परिवहन विभागाचे, पोलीस विभाग, महिला बालकल्याण, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी धात्रक, पं.स. गोंडपिपरीच्या कृषी पंचायत, रोजगार हमी, बी.आर.जी.एफ. चे विभाग प्रमुख, तालुका कृषी अधिकारी रानोडकर उपस्थित होते.
वनहक्कांचे ७४६ प्रलंबित दावे त्वरित निकाली काढण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना देण्यात आल्या. घराचे बांधकामाकरिता जागेअभावी अडचण निर्माण होत असेल तर, जागा उपलब्ध करण्याचे प्रस्ताव त्वरित तयार करून सादर करणे व मंजुरी देण्याबाबतचा सुचना संवर्ग विकास अधिकारी व तहसिलदारांना देण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे विविध शेतीविषयक योजना उपलब्ध असुन याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा याकरिता सर्कल निहाय पर्यवेक्षक व सहाय्यक यांच्यामार्फतीने योजनांची प्रसिद्धी करण्याचा सुचना देण्यात आल्या. महिला बालकल्याण विभागाने मंजुर योजना त्वरित वाटप कराव्यात व नविन योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना द्याव्या असे सांगितले.
ग्रामीण रुग्णालयात २६ पैकी १३ पदे रिक्त असुन पदे भरण्याकरिता वरिष्ठांना सुचित करण्यात आले. तालुका वैद्यकिय अधिकारी गोंडपिपरी अंतर्गत धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात पदे रिक्त असुन याचा त्वरित पाठपुरावा करण्याचे ठरविले. वीज वितरण कंपनीने कृषी संजीवनी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना द्यावा असे सुचित करण्यात आले. पावसाळ्यात ग्रामीण भागात साथीचे रोग उद्भवत असल्याने आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्याविषयी सतर्क राहुन रुग्णांना तातडीने सेवा पुरवावी, असे तालुका वैद्यकीय अधिकारऱ्यांना निर्देशीत केले. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सोमनपल्ली ते कोंडाना चेक सोमनपल्ली मार्गाचे काम रपट्यासह त्वरित पुर्ण करावे अशा सुचना देवून अधिकाऱ्यांसह मोक्यावर पाहणी करण्यात आली.
संचालन विस्तार अधिकारी मडकवार यांनी आभार संवर्ग विकास अधिकारी चंद्रशेखर पुद्दटवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)