महिलांच्या आर्थिक विकासातूनच राज्याचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 02:52 IST2016-08-21T02:52:16+5:302016-08-21T02:52:16+5:30
महिलांनी आपल्या बुद्धीचातुर्यातून व आर्थिक नियोजनातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविली आहे.

महिलांच्या आर्थिक विकासातूनच राज्याचा विकास
सुधीर मुनगंटीवार : महिला बचतगट मेळावा
राजुरा : महिलांनी आपल्या बुद्धीचातुर्यातून व आर्थिक नियोजनातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविली आहे. महिलांमध्ये निसर्गताच बचतीची सवय असते. त्यांच्या या सवयीचा लाभ त्यांना सामूहिकरित्या व्हावा. त्याद्वारे कुटुंबाचा, गावाचा व पर्यायाने राज्याचा आर्थिक विकास व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याची व बचतगटांच्या उत्पादनांना ग्राहक उपलब्ध होण्याकरिता राज्य सरकारच्या सहकार्यातून यंत्रणा उभारणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, वन व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राजुरा येथे आयोजित महिला बचत गटाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. आमदार संजय धोटे यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांकरिता व्यापारी संकुलाची निर्मिती केली जात असून या संकुलाच्या निर्मितीकरिता पंचायत समिती चौकात जिल्हा परिषदेद्वारा जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या संदर्भात आयोजित कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांनी विविध विषयांवर माहिती दिली. आमदार संजय धोटे यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती देऊन ना. मुनगंटीवारांच्या सहकार्यातून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. जि.प. बांधकाम सभापती देवराव भोंगळे यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाला आमदार संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, सरिता कुडे, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, भाजपा नेते आबीद अली, वाघुजी गेटाम, अरुण मस्की, सुनील उरकुडे, सुरेश रागीट, भाऊराव चंदनखेडे, सतीश धोटे, बाबुराव जीवने, रमेश मालेकर, वामन तुराणकर, दिलीप वांढरे, सतीश कोमरपल्लीवार, संवर्ग विकास अधिकारी राणावत, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी पानबुडे, जि.प. बांधकाम अभियंता पुरके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार धर्मेश फुसाटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश धोटे, रवी बुरडकर, मंगेश श्रीराम, कैलास कार्लेकर, उमेश मारशेट्टीवार, दीपक झाडे, राकेश कलेगुरवार, संजय उपगन्लावार, निलेश रागीट, संदीप गायकवाड, सूरज राय सिडाम, सचिन बैस, पराग दातारकर, आशिष करमरकर, सचिन बल्की, दिलीप गिरसावळे, सतीश कोमडपल्लीवार, रत्नाकर पायपरे, अंकित कुलकर्णी, ज्ञानेश्वर दुर्योधन, अनुश्री गावंडे, माणिक उपलंचीवार आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)