भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:54+5:302021-03-23T04:29:54+5:30

किशोर जोरगेवार : महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याचे सादरीकरण चंद्रपूर : माता महाकाली आमचे दैवत आहे. त्यामुळे येथील विकास कामात ...

Development should be done with devotees at the center | भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा

भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास करावा

किशोर जोरगेवार : महाकाली मंदिराच्या विकास आराखड्याचे सादरीकरण

चंद्रपूर : माता महाकाली आमचे दैवत आहे. त्यामुळे येथील विकास कामात स्थानिकांच्या सूचना अभिप्रेत आहेत. येथे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसुविधा लक्षात घेत भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विकास कामे करावीत, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

विकास आरखडा सादरीकरणादरम्यान ते बोलत होते. मोठा निधी खर्च करून माता महाकाली मंदिराच्या पुनर्विकास व सौंदर्यीकरणाचे काम केल्या जाणार आहे. यात भाविकांसह नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यासाठी रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महाकाली मंदिराच्या सभागृहात या कामाच्या विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अनेक महत्त्वाच्या सूचना नागरिकांनी केल्या. यावेळी मनीष महाराज, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपकार्यकारी अभियंता संजय मेंढे, मधुसूदन रुंगठा, गौरीशंकर मंत्री, सुनील महाकाले, प्रकाश महाकाले, आशा महाकाले, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. पालीवाल, नगरसेवक नंदू नागरकर, माजी नगरसेवक बलराम डोडानी, नगरसेवक पप्पू देशमुख, अजय जैस्वाल, धनंजय दानव, प्रभाकर दिवसे, रामजीवन परमार, नगरसेविका सुनीता लोढिया, यंग चांदा ब्रिगेड, शहर संघटिका, वंदना हातगावकर, सायली येरणे, कुक्कू सहानी, अरविंद मुसळे, सुरेश राठी, प्रभाकर मंत्री, प्रवीण कुलटे, हेरमण जोसेफ, मुन्ना जोगी यांच्यासह चंद्रपूर शहरातील भाविकांची तसेच महाकाली सेवेकरी मंडळी यांची उपस्थिती होती.

बाॅक्स

अशा केल्या सूचना

६४ फुटांचा ध्वज, ८१ फुटांची माता महाकालीची मूर्ती, गाळेधारकांना मोठी दुकाने, यज्ञकुंड तयार करणे यासह इतर सूचना या आराखड्यामध्ये कार्यान्वित करण्यात आल्या. तसेच या कामाची कमीत कमी खर्चामध्ये देखभाल करण्यात यावी, येथील खुल्या मंचावर वर्षभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावे, नागरिकांना माता महाकालीच्या आरतीचे थेट दर्शन घेता यावे याकरिता नियोजन करावे.

Web Title: Development should be done with devotees at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.