गरीब आदिवासींचा विकास हेच माझ्या जीवनाचे ध्येय

By Admin | Updated: December 22, 2016 01:49 IST2016-12-22T01:49:12+5:302016-12-22T01:49:12+5:30

विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या भागातील गरीब, आदिवासी, शेतकरी शेतमजूर यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे.

The development of poor tribals is my life's goal | गरीब आदिवासींचा विकास हेच माझ्या जीवनाचे ध्येय

गरीब आदिवासींचा विकास हेच माझ्या जीवनाचे ध्येय

प्रभाकर मामुलकर : कृषी मेळावा, रक्तदान शिबिराचे आयोजन
राजुरा : विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या भागातील गरीब, आदिवासी, शेतकरी शेतमजूर यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे. गरीबांना मुख्य प्रवाहात आणणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असून आपण त्यासाठी सतत विकासासाठी प्रयत्न करीत राहणार असल्याचे प्रतिपादन चिंचोली येथे आयोजित शेतकरी मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, आपण आपल्या आयुष्यात फक्त विकासाचे राजकारण केले आहे. जिवती तालुक्याचा प्रश्न असो की गोंडपिपरी तालुक्याचा प्रश्न असो, आपण शोषितपिडीत नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे, या भागातील मुले शिकून मोठी झाली पाहिजे, त्यांनासुद्धा समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले पाहिजे यासाठी शैक्षणिक संस्था सुरु करुन गरीबांच्या मुलांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन प्रभाकरराव मामुलकर यांनी केले.
शेतकरी मेळावा व विविध विकास कामांचे उद्घाटन राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, प्रभाकरराव मामुलकर यांच्यासारखे विकासाची विचारसरणी जोपासणारे नेतृत्व दुसरे नाही. आपणसुद्धा या विधानसभेच्या विकासासाठी सतत प्रयत्नशिल असून ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा येत्या काळात बदलणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय येगिनवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब वासाडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. चंदू मारकवार, माजी प्राचार्य डॉ. एम. वाय. पालरपवार, पशुधन अधिकारी डॉ. अनिल ठाकरे, जयदीप जिराफे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. मुर्लीधर धोटे, जिवती तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गोदरु जुमनाके, कोरपना तालुका काँग्रेस कमेटीची अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजीवसिंह चंदेल पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव जेनेकर उपस्थित होते. सिद्धार्थ पथाडे, चिंचोलीचे सरपंच माधुरी नागापुरे, उपसरपंच मारोती आत्राम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष अविनाश जाधव, जसविंदरसिंग धोतरा, प्राचार्य दौलत भोंगळे, प्राचार्य संभाजी वरकड, साजीद बियाबानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष कुमरे, काँग्रेसचे नेते भिमराव मडावी, एल. ए. मत्ते, पांडुरंग जाधव, राजीव सेनेचे तालुका अध्यक्ष पिंदरसिंग धोतरा, महादेव बोबाटे, सतिश कोमरपेल्लीवार, तिरुपती मल्लाला, ममता जाधव, अनिल मेंडूले, पंचायत समिती सदस्य भिमय्या अंगलवार उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी केले. संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार मुख्याध्यापक डी. एस. झोडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The development of poor tribals is my life's goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.