ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबध्द
By Admin | Updated: October 11, 2014 01:29 IST2014-10-11T01:29:12+5:302014-10-11T01:29:12+5:30
सामाजिक कार्य करीत असताना सावली तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच जाणे आहे. हा तालुका ३० वर्षांपासून जसा आहे तसाच आजही आहे.

ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबध्द
चंद्रपूर : सामाजिक कार्य करीत असताना सावली तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच जाणे आहे. हा तालुका ३० वर्षांपासून जसा आहे तसाच आजही आहे. या तालुक्याच्या कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही. रस्त्याची अवस्था दयनीय आहे. लोकांच्या साध्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या चौफेर विकास करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व पिरीपाचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी आज शुक्रवारी सावली तालुक्यातील विविध गावात प्रचार सभेदरम्यान केले.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले,, अच्छे दिन आने वाले है असा नारा देणाऱ्या मोदी सरकारने बुरे दिन दाखविणे सुरू केले आहे. फक्त उद्योगपतींना साथ देणाऱ्या मोदी सरकारला सामान्य मतदारांशी काहीही देणेघेणे नाही. विकासाच्या नावावर मते मागणारे लोकप्रतिनिधी क्षेत्राचा विकास करु शकले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्यासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली असून आपणाला आशीर्वाद देऊन निवडून द्यावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे अखिल भारतीय काँग्रेस पक्ष आणि पिरिपा आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील या परिसराचा दौरा केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, अॅड. रामभाऊ मेश्राम, बाला शुक्ला, आबिद भाई, राजू सिद्धम, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जि.प. सदस्य दिनेश चिटनुरवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा महासचिव प्रकाश पाटील रार्इंचवार, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)