विकासासाठी चंद्रपूर शहर ब्रॉडगेज मेट्रो सेवेशी जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:53+5:302021-07-18T04:20:53+5:30
वडगाव प्रभाग क्रमांक आठमधील विविध विकासकामांचा यावेळी शुभारंभ झाला. तसेच चिन्मय उद्यान व संत गाडगेबाबा उद्यान जनतेसाठी शनिवारी खुले ...

विकासासाठी चंद्रपूर शहर ब्रॉडगेज मेट्रो सेवेशी जोडणार
वडगाव प्रभाग क्रमांक आठमधील विविध विकासकामांचा यावेळी शुभारंभ झाला. तसेच चिन्मय उद्यान व संत गाडगेबाबा उद्यान जनतेसाठी शनिवारी खुले करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, झोन सभापती ॲड. राहुल घोटेकर, प्रभागातील नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेवक पप्पू देशमुख, नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक सुभाष कासनगोटुवार, नगरसेविका छबूताई वैरागडे, नगरसेवक संजय कंचर्लावार यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेने नवीन योजना आखण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज यावेळी व्यक्त केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी चंद्रपूर शहराच्या विकासासाठी आजवर झालेल्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडला. चिन्मय मिशनच्या उद्यानात विशेष तरतूद निधी अंतर्गत ग्रीन जिम उभारण्यात आले आहे. प्रास्ताविक राजेश्वर अल्लुरवार यांनी, संचालन डॉ. आरती जोशी यांनी केले. आभार सुनील सिद्धमशेट्टीवर यांनी मानले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीतून साकारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा उद्यानही यावेळी जनतेसाठी खुले करण्यात आले. वडगाव प्रभाग क्रमांक आठमध्ये लक्ष्मी नगर ते वडगाव सिमेंट काँक्रीट रस्ता व भूमिगत नाल्यांच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला. धनोजे कुणबी समाज सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांच्यासह या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सभापती ॲड. राहुल घोटेकर, तर संचालन स्वाती बेतावार यांनी केले.