नचीप्पण समितीच्या शिफारशींबाबत आंदोलनाचा निर्धार
By Admin | Updated: September 13, 2016 00:44 IST2016-09-13T00:44:20+5:302016-09-13T00:44:20+5:30
जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक ओबीसी फेडरेशन व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून रविवारी चंद्रपूरला पार पडली.

नचीप्पण समितीच्या शिफारशींबाबत आंदोलनाचा निर्धार
ओबीसी फेडरेशनची जिल्हा बैठक : केंद्र शासनाचे लक्ष वेधणार
चंद्रपूर : जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक ओबीसी फेडरेशन व सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटच्या माध्यमातून रविवारी चंद्रपूरला पार पडली. वर्तमान भाजप नेतृत्त्वातील मोदी सरकारच्या काळात ओबीसीवर अन्याय वाढल्याचे विविध उदाहरणे देत ओबीसी फेडरेशनचे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी दिली. यावेळी नचीप्पण समितीच्या शिफारसीबाबत आंदोलन, जनजागरण करण्याचा निर्धार करण्यात आला.
सरकारी स्तरावरील एससी, एसटी व ओबीसीची किती पदे प्रत्यक्षात भरल्या गेली, याचा आढावा घेण्यासाठी खा. सुंदरम नचिप्पण यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा व राज्यसभेच्या २७ खासदारांची समिती गठीत केल्या गेली. या समितीने जुलै २००५ मध्ये संसदेसमोर ठेवलेल्या शिफारसीवर संसदेत अजूनपर्यंत चर्चा झालेली नाही. नचिप्पन समितीच्या शिफारसी अंमलात आणल्यास सध्या लागू केल्यास एससी, एसटी व ओबीसीची पदे काटेकोरपणे भरली जातील. यासाठी आंदोलन व जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी बळीराज धोटे, प्रा. माधव गुरनुले, शिवशंकर काउलकर, प्रा. सुनील खरवडे, रविंद्र चिलबुले, भास्कर सपाट, राजेश बेले, अजमत साळवे, डॉ. बाळकृष्ण भगत, साधुजी मुसळे, कोरडे, अशोक बनकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)