शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST2021-09-23T04:31:53+5:302021-09-23T04:31:53+5:30

जिवती : शॉर्टसर्किटमुळे शेडवाही (भारी) येथील एका घराला सोमवारी रात्री १२:३९ वाजता आग लागून लाखो रुपयांचे संसारिक साहित्य जाळून ...

Destroy the house due to short circuit | शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक

जिवती : शॉर्टसर्किटमुळे शेडवाही (भारी) येथील एका घराला सोमवारी रात्री १२:३९ वाजता आग लागून लाखो रुपयांचे संसारिक साहित्य जाळून खाक झाले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शेडवाही (भारी) येथील दत्तू सोमा वाढई यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीने भीषण रूप धारण करून घरातील संसारोपयोगी साहित्यासह शेतीकरिता आणलेले १५ रासायनिक खतांच्या बॅग, डिजे सिस्टीमचे बॉक्स, टीव्ही, फ्रीज, व इतर मौल्यवान वस्तू जाळून खाक झाल्या. आग विझविण्याचा शेजाऱ्यांनी खूप प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. दत्तू सोमा वाढई या शेतकऱ्यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. घटनेचा तत्काळ मोक्का पंचनामा करून वाढई कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Destroy the house due to short circuit