उपजिल्हाधिकाऱ्यांचे वाहन मालवाहू वाहनाला धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:40 IST2018-03-12T23:40:31+5:302018-03-12T23:40:31+5:30
नागपूर येथील शासकीय काम आटोपून उपजिल्हा अधिकाऱ्यांचे वाहन चंद्रपूरकडे परत येत असताना समोरून जाणाऱ्या वाहनाला धडक दिली.

उपजिल्हाधिकाऱ्यांचे वाहन मालवाहू वाहनाला धडकले
आॅनलाईन लोकमत
वरोरा : नागपूर येथील शासकीय काम आटोपून उपजिल्हा अधिकाऱ्यांचे वाहन चंद्रपूरकडे परत येत असताना समोरून जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. यात उपजिल्हाधिकाऱ्यांसह दोन्ही वाहनातील नऊ जण जखमी झाले. यातील दोन गंभीर जखमींना चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजता रामपूर गावाच्या शिवाराजवळ घडली.
चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील काम आटोपून एमएच ३४ एव्ही ९५७२ क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनाने चंद्रपूरकडे येत होते. रामपूरजवळ स्कार्पिओची एमएच ३२ ००९७ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाला धडक बसली. यात उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हार, ज्येष्ठ लिपिक संजय पडगीलवार, अर्जुन सुतार, नंदिनी सुतार, अरुणा सुतार, करण शिंदे, सपना शिंदे, अरुण जगताप, साधना शिंदे, रोशन सुतार हे जखमी झाले.