Deprived of unorganized labor schemes | असंघटित कामगार योजनांपासून वंचित

असंघटित कामगार योजनांपासून वंचित

काही ठिकाणी असंघटित कामगारांकडून स्थायी कामगारांची कामे अल्प मोबदल्यात करवून घेतली जात आहेत. अशा कामगारांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. भविष्यनिर्वाह आणि अन्य सोई-सुविधांपासून वंचित ठेवल्या जात आहे. अन्यायाचा प्रतिकार केल्यास कामावरून कमी केल्या जाते. कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या कामगार मंडळाच्या योजनांचा लाभ दिला जात नाही.

ट्रकचालक- वाहकांसह घरगुती काम करणारे, तसेच भांडे धुणी करणाऱ्या महिलांनाही अल्प मोबदला दिला जातो. त्यामुळे या सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटित क्षेत्रातील वृद्ध कामगार व संजय गांधी निराधार योजनेतील त्रुटी अद्याप दूर झाल्या नाहीत. अल्प मोबदल्यावर पिळवणूक केल्या जाते. महिला कामगारांना कोणतीही सुरक्षा नाही. घरेलू कामगारांपासून तर विविध क्षेत्रांत मजुरीची कामे करून महिला कामगार कुटुंब चालवित आहे. त्यामुळे या सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Deprived of unorganized labor schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.