शासनाचे काम अन् वर्षभर थांब अशी पूरग्रस्त नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी येथे २२ जुलैला पूर आला. सारे काही व्यवस्थित सुरू असताना काही कळायच्या आत नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पाहता पाहता पुराचे पाणी गावात शिरले. क्षणार्धात शेकडो कुटुंबीयांचा सुखाचा संसार पाण्याखाली आला. घरातील सर्व साहित्य,अन्नधान्य जीवन उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुख समाधानाचा संसार पाण्यात बुडाला. पूर ओसरल्यानंतर शासनाने गोवरी येथील घरांचे आणि पुरामुळे बुडालेल्या शेतीचे तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले. शासनाच्या आदेशानुसार गोवरीचे तलाठी सुनील रामटेके यांनी कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार यांना सोबत घेऊन पूरग्रस्त भागातील पंचनामा करून पूरबुडीचा अहवाल शासनाला सादर केला. आज जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरी गोवरी येथील पूरग्रस्त नागरिकांना शासनाची मदत मिळाली नाही.त्यामुळे पूरग्रस्त नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
210921\img_20210921_144120.jpg
दोन महिन्यानंतरही गोवरी येथील पूरग्रस्त मदतीपासून वंचित