शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:05 IST

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.

ठळक मुद्देकेवळ दुर्लक्ष : प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे

जयंत जेणेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.कोरपना व जिवती तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर असलेला हा सिंचन प्रकल्प दोन्ही तालुक्याच्या शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून वरदान आहे. मात्र या सिंचन प्रकल्पातील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून उपसण्यात आला नाही. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात गाळ साचला गेला आहे. या सिंचन प्रकल्प अंतर्गत दोन कालवे आहेत. मात्र दोन्ही कालवे अस्वच्छतेने बरबटले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर अनेकदा पाणी पोहोचतच नाही. वनसडीकडून लोणीकडे जाणारा कालवा गेल्या कित्येक वर्षांपासून बुजला व फुटला गेला आहे. परंतु त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेकडे आजगायत दुर्लक्ष होत आहे. सिंचन प्रकल्पाच्या वेस्टवेअरलाही बºयाच ठिकाणी छोटी-मोठी गळती लागली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे. याठिकाणी कुठला सुरक्षारक्षकही तैनात नसल्याने प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत शासनाची उदासीनताच कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.पर्यटनदृष्ट्या विकास नाहीहा प्रकल्प माणिकगड पहाडाच्या अगदी लगत असल्याने, हा संपूर्ण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास केल्यास येथील पर्यटन फुलून विकास साधला जाईल. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून शासनालाही पर्यटनातून महसूल प्राप्त होईल.सदनिका दुर्लक्षितचपकडीगुड्डम सिंचन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाºयासाठी साधारणता २८ वर्षांपूर्वी चंद्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली येथे सुसज्ज वसाहत तयार करण्यात आली. परंतु निर्मितीची अनेक वर्ष लोटूनसुद्धा आजपर्यंत वसाहतीत कुणीही वास्तव्यास आले नसल्याने सदर सदनिका आजही ओस पडल्या आहेत. परिणामी इमारतीचीही बरीच नासधूस झाली आहे. यातील तारेचे कंपाऊंड, दारे, खिडक्या व अनेक साहित्यही चोरटयांनी लंपास केले आहेत. परंतु याचीही देखभाल व सुरक्षा वाऱ्यावरच आहे.प्रकल्प पकडीगुड्डमला कार्यालय गडचांदूरलाकोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे. तसेच येथील कार्यालयीन कर्मचारी संख्याही बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणेही आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण