उद्योगाविना बेरोजगारांमध्ये नैराश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:09+5:302021-01-08T05:36:09+5:30

दरम्यान कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा चंद्रपूर : तत्कालीन ...

Depression among the unemployed without industry | उद्योगाविना बेरोजगारांमध्ये नैराश

उद्योगाविना बेरोजगारांमध्ये नैराश

दरम्यान कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तंटामुक्त समित्यांना सक्रिय करा

चंद्रपूर : तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्यस्थितीत या समित्या थंडबस्त्यात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या गावांमध्ये समितींना सक्रिय करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकत्यांकडून केली जात आहे.

पकड्डीगुड्डम धरणाकडील रस्त्याची दुरवस्था

कोरपना : तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर पिपर्डा, कारगाव, धनकदेवी, मरकागोंदी, जिवतीला जाण्याचा एकमेव मार्ग आहे. परिणामी रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण नाही

चंद्रपूर : येथील बंगाली कॅप, दाताळा, रोड, बल्लारपूर रोड परिसरात काही तरुण मोठ्या प्रमाणात वाहनाचा वेग वाढवित आहे. त्यामुळे इतर वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. अनियंत्रित वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Depression among the unemployed without industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.