रोटरी क्लबतर्फे दंत मार्गदर्शन शिबिर व चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST2021-03-24T04:26:29+5:302021-03-24T04:26:29+5:30

फोटो चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दंत सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम व चित्रकला ...

Dental orientation camp and drawing competition by Rotary Club | रोटरी क्लबतर्फे दंत मार्गदर्शन शिबिर व चित्रकला स्पर्धा

रोटरी क्लबतर्फे दंत मार्गदर्शन शिबिर व चित्रकला स्पर्धा

फोटो

चंद्रपूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दंत सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम व चित्रकला स्पर्धा नुकतीच पार पडली. चित्रकला स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण घोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ. विद्या बांगडे, क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, सचिव पूनम कपूर, कल्पना गुप्ता, दुर्गा पोटूदे, शकुंतला गोयल आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. घोडे यांनी दातांची निगा कशी राखायची याबाबत मार्गदर्शन करताना दिवसातून दोनवेळा दात स्वच्छ करणे गरजेचे आहे. नाही तर दातांमध्ये कीड निर्माण होऊन दात दुखण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच उतारवयात अडचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेत विजेत्या ठरलेल्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. उपस्थितांचे आभार क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग यांनी मानले. यावेळी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Dental orientation camp and drawing competition by Rotary Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.