भूमापन कार्यालयातील कामकाजाची चौकशीची मागणी

By Admin | Updated: May 27, 2017 00:38 IST2017-05-27T00:38:20+5:302017-05-27T00:38:20+5:30

भूमापन कार्यालय नेहमीच लोकांच्या चर्चेत राहीले आहे. नूकतेच या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पक्षकाने एका खाजगी इसमासह १५ हजारांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली.

Demand for working in the Land Acquisition Office | भूमापन कार्यालयातील कामकाजाची चौकशीची मागणी

भूमापन कार्यालयातील कामकाजाची चौकशीची मागणी

ब्रह्मपुरी : भूमापन कार्यालय नेहमीच लोकांच्या चर्चेत राहीले आहे. नूकतेच या कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पक्षकाने एका खाजगी इसमासह १५ हजारांची लाच घेतल्याने अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत कामकाजत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे नागरीकांनी चौकशीची मागणी केली ओह.
तालुक्यातील महत्वपूर्ण हृदयस्थळ म्हणजे भूमापन कार्यालय होय. शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा व अन्य लोकांचा जिल्ह्याचे काम या कार्यालयापासून प्रभाविपणे होणे आवश्यक आहे. परंतु गेल्या वर्र्षी या कायालयात काम सुरू होते. त्याची चर्चा नागरिक अटकेनंतर खुलेआम करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून दिले गेलेली ‘क’ प्रत व फेरफार संशयास्पद आहेत, असे अनेकांनी तक्रार स्वरूपात बोलून दाखविले आहे. लाच घेऊन अनेक आरक्षित जागा रूपांतरित केल्या आहेत, असाही आरोप करण्यात येत आहे.
या कार्यालयात अनेक कर्मचारी असून खाजगी इसम कामकाज करीत असल्याचेही बोलले जात आहे. हे कितपत योग्य आहे, याचीही चौकशी घेणे आवश्यक आहे. शहरात नुकतीच ५२ एकरांची गुठेवारी झाली होती. हे प्रकरण संपत नाही तर पुन्हा भूमापन कार्यालयात सावळागोंधळ निर्माण झाल्याने सामान्य माणून बेजार झाला आहे. अधिकांऱ्यांनी येथील शांत व सयंमी नागरिकांचा फायदा घेऊन कायद्याची एैसीतैसी केली असल्याचेही बोलले जात आहे. या साऱ्या प्रकरणावरून गेल्या सहा महिन्यांतील झालेल्या कामकाजाची अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी व सर्वसामान्यांना न्याय मिळून द्यावा, अशी येथील जनतेकडून मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Demand for working in the Land Acquisition Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.