गोसीखुर्दचे पाणी देण्याची मागणी
By Admin | Updated: September 9, 2016 00:54 IST2016-09-09T00:54:36+5:302016-09-09T00:54:36+5:30
सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते.

गोसीखुर्दचे पाणी देण्याची मागणी
चौेगाण : सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने मांगली येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लाते. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने शेतीसाठी गोसेखुर्दच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी, येथील सरपंच मुंडरे तथा उपसरपंच गोकुल कार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
येथील शेती कोरडवाहू आहे. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे शेतकरी दरवर्षी झळ सोसत असतात. यंदा गोसीखुर्द नहराचे पाणी मिळत असल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील कास्तकार खुश आहेत. मात्र आतापर्यंत नहराची कुठलीही सुरुवात न झालेल्या मांगलीवासीयांना धानपिकाकरिता पाण्याची नितांत आवश्यकता असून ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी यांना गोसेखुर्दचे पाणी वाकडा हिवर (रणमोचन फाट्याजवळ) जवळून मांगली येथील शिवारात सोडण्यात यावे व तशी व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच नानाजी मुंडरे, उपसरपंच गोकुल कार यांच्यासह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)