शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:53+5:302021-03-25T04:26:53+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या सावटातही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी विदर्भ इंग्लिश मिडियम ...

शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोनाच्या सावटातही विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी विदर्भ इंग्लिश मिडियम ट्रस्टी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
डिसेंबर महिन्यापासून पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या सावटातही शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत. शिक्षकांचा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी दररोज संबंध येत असतो. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी लस देणे गरजेचे आहे. जर शालेय कर्मचाऱ्यांना लस दिली तर विद्याज्ञानाचे कार्य अविरत सुरू झाले. त्यामुळे फ्रंटलाईन वर्कर म्हणून शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी विदर्भ इंग्लिश मिडियम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष सुरेश मालू, कोषाध्यक्ष फ्रान्सिस कुमार, महिला संघटनेच्या अध्यक्ष स्मिता जिवतोडे, राज पुगलिया, भरत बजाज, विकास कोल्हेकर आदी उपस्थित होते.