दगडी कोळशाऐवजी गॅसचा वापर करण्याची मागणी
By Admin | Updated: May 12, 2016 01:08 IST2016-05-12T01:08:55+5:302016-05-12T01:08:55+5:30
चंद्रपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. त्यातील एक घटक म्हणजे दगडी कोळश्याचा वेकोलि परिसरात इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो.

दगडी कोळशाऐवजी गॅसचा वापर करण्याची मागणी
वेकोलिकडून प्रदूषण : चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : चंद्रपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. त्यातील एक घटक म्हणजे दगडी कोळश्याचा वेकोलि परिसरात इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे प्रदूषण वाढत असून दगडी कोळशाऐवजी गॅसचा वापर करण्यास प्रवृत्त करावे, अशी मागणी चंद्रपूर बचाव समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या वाहन विरहित दिन बैठकीत ठरल्याप्रमाणे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने लालपेठ कॉलरी परिसरात दगडी कोळसा वापरणे कसे घातक आहे व त्याऐवजी केरोसीन किंवा गॅस वापर करण्यावर मार्गदर्शन केले. यात तेथील नागरिकांनी आपल्या समस्याही मांडल्या.
यासंदर्भात तेथील नागरिकांना केरोसीन किंवा गॅस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रदूषण कमी करण्याकरिता चंद्रपूरकरांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेचे डॉ. गोपाल मुंधदा, मधुसूदन रूंगठा, दत्तप्रसन्न, महादानी, अॅड. मलक शाकीर, सुहास अलमस्त, साजिद कुरेशी, भाविक येरगुडे, सुबोध कासुलकर, ओम पवार, अमोल नगराळे, किरण भंडारी यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)