शेतकऱ्यांची वाहने टोलमुक्त करण्याची मागणी
By Admin | Updated: March 27, 2015 00:51 IST2015-03-27T00:51:10+5:302015-03-27T00:51:10+5:30
लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते,

शेतकऱ्यांची वाहने टोलमुक्त करण्याची मागणी
भद्रावती : लोकप्रतिनिधींच्या व शासकीय वाहनांना ज्याप्रमाणे महामार्गावरील टोलनाक्यांवर संपूर्ण सवलत दिल्या जाते, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या धान्याने भरलेल्या वाहनाला टोल फ्री करण्यात यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबा आस्वले यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य हे टोल राज्य झाले आहे. राज्याच्या विकासाअंतर्गत मोठमोठे महामार्ग बांधण्यात आले आणि या महामार्गावर दशकानुदशके चालणारे टोल नाके उभारण्यात आले. सरासरी एका व्यक्तीचे अर्धेअधिक आयुष्य वाहनाकरिता रस्त्याचा टोलटॅक्स देण्यात जाते. यात आमदार-खासदार यासह शसाकीय वाहनांना टॅक्स फ्री करण्यात आले आहे. वरून हे लोकप्रतिनिधी टोलनाक्यावर स्वत:चे ओळखपत्र दाखविण्याविरोधात आवाज उठवितात. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र निसर्ग, शासकीय योजना, शेतपिकाला रास्त भाव, दुष्काळ यात सदैव पिसलेला असतो. त्याच्यासाठी कोणताच टॅक्स माफ नाही म्हणून किमान शेतकरी शेतामधून बाजारात शेतपिकाने भरलेले वाहन घेवून जाताना रस्त्यात पडणाऱ्या टोल नाक्यावर त्याच्या वाहनाला टॅक्स फ्री करण्यात यावे. यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल व टोलनाका, दलाल, अडते, व्यापारी, खरेदीसाठी शासकीय दिरंगाई अशा अनेक लुटीमध्ये किमान टोल नाक्यावर बसणाऱ्या भुर्दंडातून तरी त्याची सुटका होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याने भरलेल्या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारचा टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मागणी बाबा आस्वले यांनी केलेली आहे.
सोबतच वाहन खरेदी करताना आर.टी.ओ. कार्यालयाद्वारे लावण्यात येणारा टॅक्स व पेट्रोलचे दर ठरविताना रस्ते विकासाबाबत लावण्यात येणारा करण्यात येणारा जादा कर हे दोन टॅक्स देवूनच वाहन रस्त्यावर उतरते. मग पुन्हा रस्ते विकासाच्या नाववर टोक टॅक्सची वसुली कशासाठी, असा प्रश्नही बाबा आस्वले यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)