कोठारी, तोहोगाव, लाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST2021-07-25T04:23:28+5:302021-07-25T04:23:28+5:30
कोरोनाची दुसरी लाट आणि त्यासाठी लागू केलेली संचारबंदीपासून या भागात आजपर्यंत परिवहन मंडळाची लालपरी अद्याप धावलीच नाही. कोरोनाची लाट ...

कोठारी, तोहोगाव, लाठी बससेवा सुरू करण्याची मागणी
कोरोनाची दुसरी लाट आणि त्यासाठी लागू केलेली संचारबंदीपासून या भागात आजपर्यंत परिवहन मंडळाची लालपरी अद्याप धावलीच नाही. कोरोनाची लाट ओसरली आणि मार्गावरील पुलांची कामे सुरू झाली. वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे बससेवा बंद पडली होती. या मार्गावरील परसोडी - पाचगाव पुलाचा अडसर आता दूर झालेला असून कोठारी ते सोनापूर (देश) पर्यंत मार्ग सुरळीत सुरू झालेला आहे. तेव्हा या मार्गावरील बससेवा सुरू करण्यास अडचण नाही. सध्या शेतीची कामे, शैक्षणिक कामे, कार्यालयीन कामे, करण्याची वेळ आहे. तालुका ते जिल्हा स्तरावरील कामासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. अशातच बससेवा सुरू नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तेव्हा या भागातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन बससेवेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
240721\1348-img-20210724-wa0000.jpg
फोटो