दारूचे दुकान हटविण्याची मागणी

By Admin | Updated: May 18, 2014 00:13 IST2014-05-18T00:13:40+5:302014-05-18T00:13:40+5:30

येथे गावाच्या मध्यभागी असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे विद्यार्थिनी व महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून हे दुकान हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकानी केली आहे.

Demand for the removal of liquor shop | दारूचे दुकान हटविण्याची मागणी

दारूचे दुकान हटविण्याची मागणी

शेगाव : येथे गावाच्या मध्यभागी असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे विद्यार्थिनी व महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून हे दुकान हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकानी केली आहे. शेगाव (बु.) येथील गावाच्या मध्यभागी देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोर मद्यपींचा धुमाकूळ असतो. दारूच्या नशेत मद्यपी अलि शिविगाळ भांडण करतात. या दुकानासमोरच श्रीसंत काशिनाथ कन्या विद्यालय आहे. त्यामुळे मद्यपींचा त्रास येथील विद्यार्थिनिंनाही होतो. दारूच्या दुकानात कोणतेही सूचना फलक नाही. शिवाय मुत्रीघर नसल्याने मद्यपींकडून परिसरात अस्वच्छता पसरवली जाते. त्यामुळे स्थानिक महिला व विद्यार्थिनिंना परिसरात वावरताना गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन दारूचे दुकान गावाबाहेर हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for the removal of liquor shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.