बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:41+5:302021-01-18T04:25:41+5:30

चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित चंद्रपूर : गावात दवंडी देणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सजाअंतर्गत ...

Demand for provision of bardana | बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी

बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी

चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित

चंद्रपूर : गावात दवंडी देणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सजाअंतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन देण्यात येते. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. केवळ मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.

संगणकाचा खर्च पाण्यात

चंद्रपूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तात्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्तस्थितीत असून, काही धूळ खात आहेत. परिणामी, ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन कामाचा बोजवारा उडत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे एमएसएमई मेळावा

चंद्रपूर : बँक ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने १५ जानेवारीला महाएमएसएमई मेळावा पार पडला. मेळाव्यात विविध शाखांचे ग्राहक व मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित १२ ग्राहकांना ४.७५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. कार्यक्रम चंद्रपूर विभागीय कार्यालयाचे विभागीय प्रबंधक संजीव कलवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी उपविभागीय प्रबंधक टोल व हेमंत सहारे उपस्थित होते.

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

पिंपळगाव : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मक्याचे पीक घेतले; परंतु मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासोबतच पानेे कुरतडणाऱ्या अळीनेसुद्धा मोठा कहर केला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. अगोदरच महापुराने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली व आता मक्याच्या पिकावर अळीने प्रादुर्भाव केला आहे. शेतकऱ्यांनी अळी प्रतिबंधक औषधींची फवारणी केली; परंतु पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Web Title: Demand for provision of bardana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.