डास प्रतिबंधक फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:10+5:302021-01-18T04:26:10+5:30
पुलावर जीवघेणे खड्डे कोरपना : आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाव खड्डे पडल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करत वाहन चालावावे लागते. यामुळे ...

डास प्रतिबंधक फवारणीची मागणी
पुलावर जीवघेणे खड्डे
कोरपना : आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाव खड्डे पडल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करत वाहन चालावावे लागते. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. हे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.
----
योग्य नियोजनाअभावी शहराचा विकास खुंटला
सिंदेवाही : शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर विकास कामांना गती मिळेल, अशी अशा होती. मात्र, शहराची स्थिती पाहता, गावाचा विकास झालाच नाही. त्यामुळे गावातील विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोकाट जनावरांची समस्या सुटता सुटेना
चिमूर : चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठाण मांडल्याचे चित्र रोज दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असून, या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापुरुषांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आणि भावी पिढीवर त्यांच्या चरित्राचा अनुकूल परिणाम व्हावा, यासाठी प्रत्येक गावागावात, शहरात, चौकाचौकात पुतळे उभारले जातात. त्यावरून चौकही त्या नावाने प्रसिद्ध होतो. तेव्हा त्याची सुव्यवस्था राखण्याचे कार्य स्थानिक प्रशासनाचे असते, परंतु शहरात उभारण्यात आलेले अनेक महापुरुषांचे पुतळे सध्या अस्वच्छतेत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.