प्रवासी निवाऱ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:39+5:302021-01-09T04:23:39+5:30
----- प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता चंद्रपूर : दुचाकी वा चारचाकी वाहनांच्या पुढे दिवे (हेड लाईट) लावले जाते. मात्र ...

प्रवासी निवाऱ्याची मागणी
-----
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : दुचाकी वा चारचाकी वाहनांच्या पुढे दिवे (हेड लाईट) लावले जाते. मात्र काही तरुण साधे दिवे न लावता निळ्या रंगाचे तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या तरुणांवर कारवाई करून अपघाताला टाळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
----
मोकाट जनावरांचा हैदोस
टेमुर्डा : चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील टेमुर्डा परिसरात मोकाट जणावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. जनावरांमुळे अनेक दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट जणावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वजनाच्या नावाखाली दगडांचा वापर
जिवती: ग्राहकांना वस्तू मोजून देणे व वजनानुसार बरोबर पैसे घेणे, ही व्यवहाराची पद्धत आहे. पण पैसे बरोबर देऊनही वजनात तूट निर्माण होण्याच्या प्रकारामुळे ग्राहक लुटले जात आहेत. लहान मोठ्या विक्रेत्याकडून सर्रासपणे अशी लूट सुरू असून वजन म्हणून तेवढ्या वजनाचे दगड दिसून येतात. यात अनेकदा ग्राहकाची फसगत होते. संबंधित विभागाने चौकशी करून संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
---
महामार्ग बनले मृत्यूमार्ग
कोरपना : तालुक्यातून एक राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग जातात. याचबरोबर प्रमुख जिल्हा महामार्ग, तालुका महामार्ग व ग्रामीण रस्तेही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्यावाचून नाही. या रस्त्याची थातूरमातूर डागडूजी केली जात आहे. या मार्गावरुन प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्यांची दुुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.