त्यामुळे वाघाचा बंदोबस्त तर कराच, पण शेतात वाघ येणार नाही, यासाठी जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला सोलर फेंसिंग तसेच काटेरी तार उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी युवा सेनेने केली आहे.
शेतकरी ज्या मार्गाने ये-जा करतात, त्या मार्गावर झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे त्या मार्गांवरील झाडे झुडपे नष्ट करा म्हणजे शेतकऱ्यांना मार्ग मोकळा होईल, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना, युवासेना सिंदेवाही तालुक्याच्यावतीने वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग सिंदेवाही यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष चिंतलवार, देवेंद्र मंडलवार, पंकज ननेवार, अरविंद देवतळे, देवराव लोखंडे, रवी भरडकर, विजय कटारे, मयूर आदमने उपस्थित होते.