बल्लारपूर रेल्वे स्थानकात ‘एक्सीवेटर लिफ्ट’ लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:10+5:302021-02-05T07:36:10+5:30
बल्लारपूर : बल्लारपूर हे दक्षिण व मध्य भारताचे एकमेव जंक्शन रेल्वे स्थानक असून, येथून सर्व ऱाज्यातील सर्वप्रकारचे प्रवासी प्रवास ...

बल्लारपूर रेल्वे स्थानकात ‘एक्सीवेटर लिफ्ट’ लावण्याची मागणी
बल्लारपूर : बल्लारपूर हे दक्षिण व मध्य भारताचे एकमेव जंक्शन रेल्वे स्थानक असून, येथून सर्व ऱाज्यातील सर्वप्रकारचे प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे स्थानकात प्लॅटफार्मपर्यंत सामान हातात घेऊन जाणे फार अवघड जाते. त्यामुळे प्रवाशांच्या साेईसाठी या रेल्वे स्थानकात ‘एक्सीवेटर लिफ्ट’ बसवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळयासाठी स्थानक परिसरात शेड तयार करावी, आरक्षण व जनरल तिकीट घर वेगळे करावे, वाढत्या वाहतुकीच्या प्रमाणात गोडावून मोठे व नवीन बनवावे, जुन्या वस्तीतून येणाऱ्या लोकांकरिता असलेल्या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा, रेल्वे स्थानकावर अकस्मात आजारी पडलेल्या प्रवाशांना प्रथमोपचार व रुग्णवाहिकेची साेय उपलब्ध करावी, शिशू स्तनपानाकरिता महिलांना सुविधा उपलब्ध करावी, आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाप्रबंधक संजीवकुमार मित्तल यांना देण्यात आले. महाप्रबंधक मित्तल यांनी शुक्रवारी बल्लारपूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरध्यक्ष बादल उराडे, कार्याध्यक्ष राकेश सोमाणी, उपाध्यक्ष शेख आरीफ शेख सरवर, अल्पसंख्याक शहरध्यक्ष इब्राहिम शेख, तालुकाध्यक्ष शेख असद, संजय अग्रवाल, विनोद गिदवाणी, संतोष कोंडुकवार, सुमीत डोहने उपस्थित होते.