घुग्घुसला अप्पर नायब तहसीलदार कार्यालय देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:06+5:302021-02-05T07:36:06+5:30
जिल्ह्यात ओद्योगिक क्षेत्र म्हणून सुपरिचित असलेल्या घुग्घुस गावाची लोकसंख्या ४० हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी १९९९ ला लोकांची मागणी ...

घुग्घुसला अप्पर नायब तहसीलदार कार्यालय देण्याची मागणी
जिल्ह्यात ओद्योगिक क्षेत्र म्हणून सुपरिचित असलेल्या घुग्घुस गावाची लोकसंख्या ४० हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी १९९९ ला लोकांची मागणी लक्षात घेता शासनाने नायब तहसीलदार कार्यालय सुरू केले. कार्यालयात नायब तहसीलदार, कारकून व शिपाई असे कर्मचारी कार्यरत होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून कार्यालयात कोणताही कर्मचारी नसून त्या कार्यालयावर राजस्व विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांचा कब्जा आहे. तर स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी कागदोपत्री असलेले नायब तहसीलदार येऊन ध्वजारोहण करीत असतात. घुग्घुसच्या नागरिकांना तहसीलचे कामकाज करीत ३० किमी अंतरावर जाऊन कामे करावे लागत आहे. त्यात वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होतो. नागरिकांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी घुग्घुस येथे कायमस्वरूपी अप्पर नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे, अशी मागणी घुग्घुस येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.