बीपीएल प्रमाणपत्रधारकांनाही गॅस कनेक्शन देण्याची मागणी

By Admin | Updated: July 22, 2015 01:37 IST2015-07-22T01:37:09+5:302015-07-22T01:37:09+5:30

केंद्र शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन योजना सुरू झाली.

Demand for gas connection to BPL certificates | बीपीएल प्रमाणपत्रधारकांनाही गॅस कनेक्शन देण्याची मागणी

बीपीएल प्रमाणपत्रधारकांनाही गॅस कनेक्शन देण्याची मागणी

बल्लारपूर : केंद्र शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत बीपीएल रेशन कार्डधारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन योजना सुरू झाली. या योजनेमध्ये बीपीएल रेशन कार्डधारकांना विना अनामत राशी भरवून गॅस कनेक्शन मिळणार आहेत. या योजनाच्या लाखो बीपीएल राशनकार्ड धारकांना लाभ मिळेल.
या योजनेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. केंद्र शासनाच्या या जनकल्याणकारी योजनेत बीपीएल राशनकार्ड धारकाप्रमाणे बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांनासुद्धा या योजनेच्या लाभ मिळवा, यासाठी बल्लारपूरच्या नगरसेविका वर्षा सुंचूवार यांनी एका शिष्टमंडळाद्वारे केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर आणि राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले आहे.
देशात जे नागरिक अत्यंत गरीबीमध्ये जीवन जगत आहे अशा नागरिकांना शासनाने बीपीएल यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. परंतु त्यांना बीपीएलचे राशनकार्ड नाही. त्यामुळे त्यांना बीपीएल राशनकार्ड धारकांप्रमाणे लाभ मिळत नाही.
केंद्र शासनाने बीपीएल राशनकार्ड धारकांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ बीपीएल प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना सुद्धा देण्यात यावे, अशी सर्व बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांची अपेक्षा आहे. या विषयांवर दोन्ही मंत्र्यांना निवेदन सोपविण्यात आले. लवकरात या विषयावर निर्णय घेऊन बीपीएल प्रमाणपत्र असलेले नागरिकांना लाभ देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Demand for gas connection to BPL certificates