सरळ सेवा पद भरती नव्याने घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:16+5:302021-07-02T04:20:16+5:30
आपल्या राज्यामध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे ...

सरळ सेवा पद भरती नव्याने घेण्याची मागणी
आपल्या राज्यामध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. सरकारने गेल्या तीन वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे बेरोजगारांची महाराष्ट्रामध्ये संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा परिणाम युवा बेरोजगारांवर होत आहे. युवक मानसिकरीत्या खचत चालले आहेत. तरुणांचा उद्रेक होण्यापूर्वीच आपण सर्व विभागनिहाय नव्याने पदभरती चालू करून परीक्षांची तारीख जाहीर करावी व इतर परीक्षांच्या जाहिराती व वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे व सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड, विशाल राठोड, शुभम वालदे, मयूर मेश्राम, कुंदन लांजेवार, अमर गाडगे, संदीप कामडी व निखिल डांगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
010721\img-20210701-wa0100.jpg
नायब तहसिलदार यांना निवेदन देताना