शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सावधान ! प्लांटमधून घराघरांत विषारी वायूची ‘एन्ट्री’, आजाराला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 18:25 IST

या प्लांटच्या विषारी वायूमुळे वरील परिसरातील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झळ बसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाचेही बिघडत आहे संतुलनघरात, वाहनावर काळा तेलकट थर

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : बोरगाव रोडवरील रामदेवबाबा साल्वंट प्लांटमधून मोठ्या प्रमाणात जीव घेणारा विषारी वायू पसरत आहे. या प्लांटमधून निघणाऱ्या धुरामधून तेलकट पदार्थ, कण व विषारी पदार्थ ब्रह्मपुरी शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये उत्सर्जित होत असल्याने परिसरातील अनेक घरांमध्ये काळा तेलकट थर जमा होत आहे. घरामधील वाहनावर हा थर दिसून येतो.

नागरिकांना या विषारी वायूमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. भविष्यात हा प्लांट अनेक नागरिकांना आजाराचे निमंत्रण देणार आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी-बोरगाव रोडवर असलेल्या रामदेवबाबा साल्वंट प्लांट तत्काळ बंद करण्याची मागणी ब्रम्हपुरी नगरपरिषद नियोजन सभापती महेश भर्रे यांनी केली आहे.  

सदर प्लांटच्या आजूबाजूला उदापूर, नवेगाव, बोरगाव, झिलबोडी, परसोडी, मालडोंगरी, चिंचोली आदी गावे असून ब्रम्हपुरी नगरपरिषद क्षेत्रात असलेले ज्ञानेशनगर, पेठवार्ड, टिळकनगर, धुमनखेडा आदी परिसर येतात. या प्लांटच्या विषारी वायूमुळे वरील परिसरातील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झळ बसत आहे. या प्लांटच्या वायू प्रदूषणाची मात्रा प्रदूषण विभागाने त्वरित तपासणी करावी, अशी मागणी सभापती महेश भर्रे यांनी केली आहे.

विशेष म्हणजे रामदेवबाबा प्लांटमध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता अवैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप भर्रे यांनी केला असून, या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, विभागीय आयुक्त, नागपूर, अप्पर सचिव पर्यावरण व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदन दिले आहे. पुढील कारवाई न केल्यास ब्रह्मपुरी नगरपरिषदच्या समोर जनआंदोलन व आमोरण उपोषण केला जाईल, असा इशाराही सभापती महेश भर्रे यांनी दिला आहे.

भुतीनाल्यामध्ये रसायनयुक्त पाणी

रामदेवबाबा प्लांट हा भुतीनाला जवळ असल्याने येथील प्रदूषित तथा रासायनिक पाणी हे या भुतीनाल्यामध्ये प्रवाहित करण्यात येते. यामुळे जल प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप भर्रे यांनी केला आहे. भुतीनाल्याचे पाणी हे जनावरे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र तेथील पाणी प्रदूषित होत असल्याने जनावरांना पिण्यायोग्य नाही. तसेच भुतीनाल्याधील पाणीपुरवठा हा ग्रामीण भागात होत असल्याने भविष्यात येथील रासायनिक पाण्याने अनेक दुर्धर आजार होण्याची शक्यता महेश भर्रे यांनी वर्तविली आहे.

रामदेवबाबा साल्वन्ट कंपनी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीने देशात दुसरा क्रमांक प्राप्त करून ब्रम्हपुरीचे नावलौकिक केले आहे. प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. दूषित पाणी रिसायकलिंग करून कंपनीतच वापरले जात आहे. त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही.

-नीलेश मोहता, संचालक, रामदेवबाबा साल्वंट प्रा. ली. ब्रम्हपुरी(बोरगाव).

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणbramhapuri-acब्रह्मपुरी