राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वेगेटवर उड्डाण पुलाची मागणी

By Admin | Updated: March 5, 2016 00:50 IST2016-03-05T00:50:33+5:302016-03-05T00:50:33+5:30

राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटवर उड्डाणपुल बनविण्याची मागणी राजुरा येथील अनेक विद्यार्थी संघटनानी केली आहे.

Demand for the flyover at the railway gate of Rajura-Asifabad road | राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वेगेटवर उड्डाण पुलाची मागणी

राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वेगेटवर उड्डाण पुलाची मागणी

राजुरा : राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटवर उड्डाणपुल बनविण्याची मागणी राजुरा येथील अनेक विद्यार्थी संघटनानी केली आहे.
राजुरा येथील या गेटपलीकडे अनेक शैक्षणिक संस्था असुन जवळपास १० हजार विद्यार्थी ये-जा करतात. यामध्ये शिवाजी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, सिद्धार्थ तेलगू विद्यालय, न्यू एरा इंग्लिश कॉन्व्हेंट राजुरा, पीएम डीएड कॉलेज राजुरा, लक्ष्मीबाई मामुलकर महिला महाविद्यालय या शाळेमधील हजारो विद्यार्थ्यांना या रेल्वेगेटचा फटका बसत आहे. केवळ सिमेंट उद्योगाचे चोचले पुरविण्यासाठी हे रेल्वेगेट असुन दिवसातून १५ वेळा गेट बंद होत असते. त्यामुळे विद्यार्थी, पालक, कर्मचारी अर्धा-अर्धा तास उभे राहावे लागते. सर्वत्र परीक्षा असल्यामुळे नेमके परीक्षेच्या वेळेआधी गेट बंद होते. या गेटमुळे अत्यंत मनस्ताप होत असुन विद्यार्थ्याना वेठीस धरण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. अनेक निवेदने दिली परंतु रेल्वे विभागाला अजुनपर्यंत जाग आलेली नाही. शासनाने २०० ठिकाणी ओव्हरब्रीज बनविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील १० हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे रेल्वेगेट मंजुर करण्याची मागणी विद्यार्थी संघटनानी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Demand for the flyover at the railway gate of Rajura-Asifabad road