वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST2021-02-19T04:17:29+5:302021-02-19T04:17:29+5:30
ढगाळ वातावरणाचा बसणार फटका चंद्रपूर : दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रबी शेतपिकांना बसत आहे. ...

वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी
ढगाळ वातावरणाचा बसणार फटका
चंद्रपूर : दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका रबी शेतपिकांना बसत आहे. त्यामुळे सध्या शेतकरी चिंतित दिसून येत आहे. पाऊस आल्यास मोठे नुकसान होणार आहे.
शालेय वेळेत बस सोडण्याची मागणी
राजुरा : शहरात अनेक प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालये आहेत. या शाळा फ, महाविद्यालयांत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून असंख्य विद्यार्थी येतात. मात्र, त्यांना वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना तासिकेपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच काही वेळा बस न मिळाल्याने घरी परत यावे लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अवैध पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
चंद्रपूर : मनपा प्रशासनाने पे पार्किंग सुरू केली असली तरी आझाद बागेजवळील रघुवंशी कॉम्प्लेक्स ते हिंदी सिटी हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर अवैधरीत्या चारचाकी वाहने पार्क केली जातात. ही वाहने दिवसभर तिथेच राहत असल्याने या रस्त्यावर अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वयंरोजगार शिबिर सुरू करा
वरोरा : शासनाकडून नोकरभरती बंद केल्यामुळे जागा निघणे बंद झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस बेरोजगारीच्या संख्येत वाढ होत आहे. शासन बेरोजगारांसाठी मोठमोठ्या योजना राबविण्याचा दावा केला जातो. परंतु, योजना पोहोचत नाही. त्यामुळे स्वयंरोजगार शिबिर सुरू करावे, अशी मागणी आहे.