महा ई-सेवा केंद्र वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:35+5:302021-01-13T05:11:35+5:30
विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा कोरपना : येथे शासकीय विश्रामगृह सुरू करण्यात आले आहे. तेथील कक्षांना पैनगंगा व वर्धा नावे ...

महा ई-सेवा केंद्र वाढविण्याची मागणी
विश्रामगृहाच्या कक्षांचे नामांतर करा
कोरपना : येथे शासकीय विश्रामगृह सुरू करण्यात आले आहे. तेथील कक्षांना पैनगंगा व वर्धा नावे देण्यात यावी, जेणेकरून या कक्षांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. तसेच या नद्या तालुक्याच्या सीमेला लागून असल्याने त्यांची माहिती नवीन व्यक्तीस होण्यास मदत होईल.
राजुरा उपविभागाचे विभाजन करा
जिवती : राजुरा उपविभागाच्या कामाचा व्याप बघता येथील उपविभागीय कार्यालयांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यात महसूल, पाणीपुरवठा, सिंचन विभागाचा समावेश आहे. या उपविभागात तीन तालुके आहेत. त्यामुळे कामाला दिरंगाई होत आहे.
भूमिअभिलेखची रिक्त पदे भरण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. पदे भरण्यात आल्यास कामाला गती मिळेल.
सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
नागभीड : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सुविधा होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.
पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधा
कोरपना : तालुक्यातील परसोडा, गांधीनगर, सांगोडा, भारोसा येथे पैनगंगा नदीवर बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला जलसिंचन करण्यासाठी सोयीचे होईल तसेच कोरडवाहू जमिनी ओलिताखाली येतील.