भीक मांगो आंदोलनाची रक्कम आयुक्तांकडे सुपूर्द
By Admin | Updated: March 28, 2015 01:03 IST2015-03-28T01:03:06+5:302015-03-28T01:03:06+5:30
महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराविरुध्द चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रथम साखळी उपोषण

भीक मांगो आंदोलनाची रक्कम आयुक्तांकडे सुपूर्द
चंद्रपूर : महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराविरुध्द चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रथम साखळी उपोषण, मौन व्रत, भीक मांगो त्यानंतर अन्यत्याग आंदोलन करण्यात आले. मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये कोणताही फरक पडला नाही. शुक्रवारी भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रक्कम आयुक्तांकडे सुपूर्द करून या रकमेतून गरजु आणि गरीब नागरिकांच्या घरांचा टॅक्स भरण्याची विनंती करण्यात आली. सोबतच महापौर, उपमहापौरांच्या बेंबधशाहीला आळा घाण्याकरिता जनहित याचिका, लोकआयुक्त विभाग, लाचलुचपत विभाग आणि सीआयडी चौकशीची मागणी निवेदनातून करण्यात आली.
महानगरपालिकेने नागरिकांकडून एलबीटी, घर टॅक्स, व्यवसाय परवाना शुल्क अशा अनेक टॅक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केल्या जातो. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी खर्च न करता मनमर्जीनुसार कारभार सुरु केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील कचरा उचलण्याकरिता दोन निविदा काढण्यात आल्या. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर निविदा मागे घेण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यातून मिळालेली रक्कम आयुक्तांकडे सुर्पूद करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, केशव रामटेके मो. सुलेमान अली, राजी काझी, निखिल धनवलकर, अनवर अली, मुन्ना शहा, विक्रम खनके, अंजुन दास आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)