नाल्याच्या खोलीकरण व साफसफाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST2021-06-01T04:21:23+5:302021-06-01T04:21:23+5:30
दोन्ही वस्तीच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या नाल्यामध्ये पूर्णपणे कचरा साचला असून, सतत दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व ...

नाल्याच्या खोलीकरण व साफसफाईची मागणी
दोन्ही वस्तीच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या नाल्यामध्ये पूर्णपणे कचरा साचला असून, सतत दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण झाल्या असून, या नाल्याची साफसफाई व खोलीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. नाल्यात घाणीचा विळखा पसरला असून, लवकरात लवकर नाला साफ करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर, नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य अभय मुनोत, बिबी ग्रामपंचायतीचे सदस्य नरेंद्र अल्ली, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, हारून सिद्दिकी, गणेश लोंढे आदींनी अल्ट्राटेकचे महाव्यवस्थापक विजय एकरे व उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे यांच्याकडे केली आहे. लवकरच नाला सफाई करून देऊ, असे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
===Photopath===
310521\img-20210530-wa0017.jpg
===Caption===
अश्या प्रकारे नाला अदृष्य झाला आहे.