पिकांचा विमा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST2021-02-26T04:41:38+5:302021-02-26T04:41:38+5:30

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन शाखा व पीक विमाधारक शेतकरी यांच्यातर्फे तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान ...

Demand for crop insurance | पिकांचा विमा देण्याची मागणी

पिकांचा विमा देण्याची मागणी

सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन शाखा व पीक विमाधारक शेतकरी यांच्यातर्फे तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली.

सन २०२०-२१ च्या खरीप धान पिकाची, नैसर्गिक आपत्ती वादळवारा, रोग मावा-तुडतुडा, किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळावी, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी, निराधार, अपंग योजनेच्या अनुदानात वाढ करावी, कोरोनाकालीन घरगुती वीज बिल माफ करावे, खाद्यतेल व जीवनावशक वस्तूंच्या दरावर नियंत्रण ठेवणे, शेतकरीविरोधी तिन्ही कायदे रद्द करणे, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन सावरगाव शाखा प्रमुख व अध्यक्ष प्रा. युवराज रामटेके, उपाध्यक्ष जितेंद्र मुंगमोडे, राज्य संघटक निकेश अलोणे, गोपाल बोरकर, अश्विन बोरकर, सतीश लोणारे, बालू मेश्राम, सागर अलोणे, नाना बारसागडे, तुलोपचंद गेडाम, निकेश रामटेके आदींची उपस्थिती होती.

Web Title: Demand for crop insurance