नुकसान भरपाई देण्याची मागणी
By Admin | Updated: January 21, 2016 01:15 IST2016-01-21T01:15:59+5:302016-01-21T01:15:59+5:30
मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती.

नुकसान भरपाई देण्याची मागणी
चिमूर : मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व चिमूर तालुका दुषकाळग्रस्त घोषित कण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू देवतळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले.
शेतकरी अत्यंत डबघाईत आला असून सन २०१५-१६ च्या शेती हंगामात पाऊस अपुरा पडल्याने धान्याची उत्पन्न कमी प्रमाणात झाले. लागवडी खर्च जास्त तर उत्पन्न कमी झाले. तसेच बाजारात कापूस, धान, सोयाबिन मालास भाव नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड करु शकत नाही. सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांशी कैवारीची भाषा बोलत असणारे मात्र विसर पडला आहे.
चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल डिझेल दर कमी करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजू देवतळे, शहर अध्यक्ष राजू हिंगणकर, माजी जि.प. अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, नगरसेवक विनोद ठाकूरकर, कदीर शेख, अॅड. अरुण दुधनकर, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधव बिरजे, उपाध्यक्ष प्रकाश बोकारे, संजय डोंगरे, देवानंद गावंडे, बाळकृष्ण बोभाटे, अरविंद रेवतकर, धनराज मालके, दादा दहीकर, अविनाश अगडे, आशिष उमरे, राकेश साटोणे, अरविंद रेवतकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)