गौणखनिज परवाना रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: October 8, 2015 00:44 IST2015-10-08T00:44:47+5:302015-10-08T00:44:47+5:30
सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले गाव असून मागील ३० वर्षापासून येथील डोंगरावर वैध, अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे.

गौणखनिज परवाना रद्द करण्याची मागणी
उपरी : सावली तालुक्यातील व्याहाड (बुज) हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले गाव असून मागील ३० वर्षापासून येथील डोंगरावर वैध, अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. त्यामुळे निसर्गसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर असून परवाने रद्द करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
व्याहाड गाव हे डोंगरदऱ्यानी व्यापलेले असून निसर्ग सौंदर्य मिळालेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असताना शासनाने या गावास खनिज मंत्रालयाच्या निधीतून वगळले आहे. मात्र मागील तीस वर्षापासून येथील नैसर्गिक देणगी असलेले डोंगर खोदण्यास प्रशासनाने परवाना देवून गावाच्या खनिज संपत्तीचा लाभ शासन दरबारी वळविला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला काहीही महसुल मिळालेला नाही. येथील डोंगरावरून वैध-अवैधरीत्या मुरुम, गिट्टीचे उत्खनन होत असल्याने डोंगर परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे उत्खनन परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)