बँकानी कर्ज वसुली थांबविण्याची मागणी
By Admin | Updated: February 2, 2015 23:04 IST2015-02-02T23:04:11+5:302015-02-02T23:04:11+5:30
चिमूर तालुक्यात गत दोन वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकावर होवून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत बँकानी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे.

बँकानी कर्ज वसुली थांबविण्याची मागणी
शेतकरी संकटात : बँकांनी सहकार्य करावे
भिसी: चिमूर तालुक्यात गत दोन वर्षापासून पावसाच्या लहरीपणाचा परिणाम पिकावर होवून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत बँकानी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीचा तगादा लावला आहे. कर्ज वसूली थांबवून मदतीचा हात पुढे करुन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिमूर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबिन व धानपिकाचे नुकसान झाले. आणेवारी पन्नास टक्क्याच्या खाली आल्यामुळे ओल्या दुष्काळाची झळ शेतकऱ्यांना बसली. यावर्षी मात्र, पावसाने दगा दिल्याने पिकांवर लाल्या रोगाची लागण झाली. सोयाबिन पेरले असता, एकरी अर्धा पोता सोयाबिन झाले. यात शेतकऱ्यांचा खर्च निघाला नाही.
चिमूर तालुक्यातील बोडधा, पिंपळगाव, डोमा, गावाप्रमाणेच अनेक गावामध्ये रोवणी होऊ शकली नाही. आता पाऊस न आल्याने रब्बी पिकांची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे बॅकांनी कर्ज वसूली थांबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)