महिलांना शिलाई मशीनचे वितरण
By Admin | Updated: June 26, 2016 00:46 IST2016-06-26T00:46:02+5:302016-06-26T00:46:02+5:30
येथील पंचायत समिती अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील

महिलांना शिलाई मशीनचे वितरण
२५ विद्यार्थिनींना मिळाली सायकल : महिला व बालकल्याण विभागाची योजना
बल्लारपूर : येथील पंचायत समिती अंतर्गत महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील १३५ गरजु महिलांना शिलाई मशीनचे वितरण गुरुवारी करण्यात आले.
यावेळी २० महिलांना सौर कंदील व २५ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बल्लारपूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम, महिला व बालकल्याण अधिकारी वंदना दुधाने, विस्तार अधिकारी आरती जगताप, शशिकला खिरटकर, कल्पना देवगडे, अमोल उघडे, सुधाकर खांडरे यांची उपस्थिती होती.
यावेळी रामभाऊ टोंगे म्हणाले, महिला व बालकल्याण विभाग महिलांच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवीत आहे. यासाठी जिल्हा परिषद विशेष निधीची तरतूद करते. मात्र लाभार्थी अर्जाची पूर्तता करताना बोगस प्रमाणपत्राचा आधार घेताना दिसतात. परिणामी खरे लाभार्थी वंचित राहण्याचे प्रकार टाळण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
विसापूर, कोठारी, नांदगाव (पोडे) पळसगाव, बामणी, मानोरा, कळमना, किन्ही, कवडजई येथील लाभार्थ्यांना सौर कंदील, सायकल व शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. संचालन कल्पना देवगडे यांनी तर आभार शशिकला खिरटकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)