राष्ट्रीय महामार्ग निर्मितीला विलंब

By Admin | Updated: June 28, 2015 01:56 IST2015-06-28T01:56:09+5:302015-06-28T01:56:09+5:30

नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे.

Delay in national highway production | राष्ट्रीय महामार्ग निर्मितीला विलंब

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीला विलंब

बायपाससाठी राजकीय दबाव : शेतकऱ्यांची नुकसान होण्याची शक्यता
ब्रह्मपुरी : नागपूर- ब्रह्मपुरी- आरमोरी या राज्य मार्गाने आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर झाले आहे. रस्त्याच्या डागडूजी बद्दल सांगितले असता संबंधित विभागाचे उत्तर असते की, हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला असल्याने आम्ही काम करु शकत नाही तेव्हा एक तर राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असेल तर कामाला विलंब होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी केली जात आहे.
नागपूर- उमरेड- भिवापूर- नागभीड- ब्रह्मपुरी- आरमोरी या मार्गाचे राज्यमार्ग रुपांतरित राष्ट्रीय महामार्ग ३५/३/डी होणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीत अनेक व्यावसायिकांच्या इमारती व काही प्रमाणात शेतजमिनी जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच काही राजकीय पुढाऱ्यांनी दबाव टाकून त्याऐवजी बायपास रोड बनविण्याविषयी योजना आखली जात असल्याने महामार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. बायपास रोड काढताना अनेक शेतकऱ्यांच्या उपजिवेकेचे साधन असलेल्या शेतजमिनी जाणार असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचेही बोलले जात असल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात यावी असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.
या राष्ट्रीत महामार्गाच्या कामासाठी रुंदीकरण सर्वेक्षण व अंदाजपत्रकात पुल, वळण, बायपास संबंधी पूर्ण माहिती सादर केली असून उमरेड, भिवापूर, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी मार्ग आता चार पदरी होणार आहे. गावाबाहेर राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण मध्यापासून २२ मिटर राहणार आहे. परंतु गावात याच नियमाने घेतल्यास अनेक व्यवसायीक कॉम्प्लेक्स, इमारती अतिक्रमणात येत असल्याने त्या हटविण्यात येणार असल्याने काही व्यावसायिकांना भिती निर्माण झाली आहे.
परंतु राजकीय दवाब टाकून गावाच्या बाहेरुन बायपास काढण्याच्या हालचाली सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धनशक्तीचाही वापर होत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या पक्या इमारती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींमधून बायपास काढण्याचा मनसूबा रचल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची वेळ येणार असल्याने शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. रस्ता शहरातूनच व्हावा, अशी सामान्य जनतेची भावना आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Delay in national highway production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.