जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:37+5:302021-01-13T05:11:37+5:30
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी चंद्रपूर : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात ...

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
चंद्रपूर : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु, जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
पाणी एटीएम मशीन सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील पाणी एटीएम मशीन मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. दूषित पाण्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
चंद्रपूर : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावात पोहोचविली जात आहे. शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, जलनगर आदी परिसरात अनेक विक्रेते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे परिसरात शांतता भंग होत याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गंजलेल्या खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकदा हे खांब बदलविण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
पोंभुर्णा : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.