विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात पदवी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST2021-03-09T04:31:24+5:302021-03-09T04:31:24+5:30
मूल : तालुक्यातील विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात पदवी वितरण
मूल : तालुक्यातील विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ बेंबाळचे उपाध्यक्ष सुरेश अहिरकर, प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य के. एन. हिरादेवे, प्रा. उमक , प्रा. रामटेके, प्रा. भसारकर यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सूरज बांगरे, ज्ञानेश्वर बांगरे, आशिष सेलोटे, अजित शेंडे, गिरीश तेलसे, नंदकिशोर पोटे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. देशमुख, प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य के.एन.हिरादेवे तर उपस्थिताचे आभार प्रा. प्रताप गिरीवार यांनी मानले.