जनता रस्त्यावर उतरण्यापूवी दर घटवा
By Admin | Updated: November 5, 2016 02:14 IST2016-11-05T02:14:33+5:302016-11-05T02:14:33+5:30
सरकार स्थापनेपूवीÊ सवÊसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने सवÊसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे.

जनता रस्त्यावर उतरण्यापूवी दर घटवा
काँग्रेसचे निवेदन : अच्छे दिनची घोषणा हवेत विरली
चंद्रपूर : सरकार स्थापनेपूवीÊ सवÊसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने सवÊसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे.सत्तास्थापनेची दोन वषाÊपूवीÊ निमित्ताने सरकारने थेट अनुदानित स्वयंपाक गॅस आणि रॉकेलचे दर वाढवून भाजप सरकारने भांडवलदारांना दिलेली वचनपूतीÊ केली आहे. मात्र यात सवÊसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून जनता रस्त्यावर उतरण्यापूवीÊ सरकारने गॅसची दरवाढ आणि रॉकेलची दरवाढ रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातफेÊ चंद्रपूर शहर काँग्रेसचे सचिव महेश मेंढे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चचाÊ करून मागण्याचे निवेदन शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमाफÊत देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या दरवाढीवर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्र सरकारद्वारे अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये गेल्या पाच महिन्यांच्या काळात सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यावरून गरीब जनतेला मिळणारी सबसिडी सरकारद्वारे बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकार महागाईवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी दिसत आहे. स्वयंपाकाचा गॅस व रॉकेलचे दर कमी करून सरकारने निवडणुकीमध्ये सवÊसामान्य जनतेला दिलेले आश्वासन पाळावे व वाढीव दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे सचिव अनिल नरूले, काँग्रेस मिडीया सेलचे सी रेमण्डस, वैभव वावरे, रोशन रोहन, महेश गावडे, गजानन निबरड, सुमित वालके आदींचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)